ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 मंचाचे नियम

Go down 
लेखकसंदेश
Admin
Site Administrator
Site Administrator


लिखाणांची संख्या : 5
Join date : 30/03/2011

मंचाचे नियम Empty
लिखाणविषय: मंचाचे नियम   मंचाचे नियम Icon_minitime12/4/2011, 3:32 am


"ग्राहक तक्रार मंच" हा एक अशासकीय असा पूर्णतः खाजगी व स्वतंत्र मंच आहे. ग्राहकांना आपल्या तक्रारी मराठी भाषेतून मांडता याव्यात हा यामागील प्रमुख उद्देश आहे. येथे लिखाण करण्यापूर्वी खालील नियम वाचावेत व त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.

१. आपली तक्रार कोणत्या वर्गीकृत सार्वत्रिकेत बसते हे पाहून आधी योग्य ती सार्वत्रिका निवडावी.

२. फक्त मराठी भाषेतूनच लिखाण करावे. त्यासाठी गुगल ट्रान्सलेशन या सेवेचा उपयोग करावा. (तेथे जाण्यासाठी गुगल ट्रान्सलेशन शब्दावर वर क्लिक करा.)

३. कोणत्याही प्रकारचे अश्लील, बदनामीकारक, मानहानीकारक किंवा कुणाच्याही भावना दुखावतील अश्या प्रकारचे लिखाण करण्यास सक्त मनाई आहे.

४. एखादी सेवा किंवा सेवापुरावाठादार/एखादे उत्पादन किंवा त्याचे उत्पादक, यांना केवळ वैरभावनेने लक्ष करुन आकसापोटी त्यांच्या विक्रीवर विपरीत परिणाम व्हावा या हेतूने लिखाण करु नये.

५. तक्रार करण्यापूर्वी ती रास्त असल्याची आधी स्वतःची खात्री करून घ्यावी. केवळ गैरसमजुतीवर आधारित तक्रार करु नये.

६. या मंचावर फक्त तक्रारीबाबतच लिखाण करावे. इतर विषय उपस्थित करु नयेत.

७. या मंचावर लिहलेल्या तक्रारीतील मजकुराची सर्व प्रकारची कायदेशीर जबाबदारी ही तो मजकूर लिहलेल्या लेखकाचीच राहील. व्यवस्थापन त्यास जबाबदार असणार नाही.

८. येथे केलेल्या लिखाणात व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन सहमत आहे किंवा असेलच असा अर्थ कोणी घेऊ नये.

९. सदरचा "ग्राहक तक्रार मंच" हा पूर्णतः खाजगी व स्वतंत्र आहे. येथे तक्रार लिहली याचा अर्थ तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे असा होत नाही.

१०. गैरवापर टाळण्याचा दृष्टीने अगदीच अपरिहार्य असल्याशिवाय आपले दूरध्वनी/मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडी लिहू नयेत. गैरवापर झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
वापस वरती Go down
 
मंचाचे नियम
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: नियमावली-
येथे जा: