ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 IDEA चे प्रिपेड सिमकार्ड

Go down 
लेखकसंदेश
Upadhye Gurujiलिखाणांची संख्या : 1
Join date : 20/04/2011

IDEA चे प्रिपेड सिमकार्ड Empty
लिखाणविषय: IDEA चे प्रिपेड सिमकार्ड   IDEA चे प्रिपेड सिमकार्ड Icon_minitime20/4/2011, 2:02 pm

माझ्याकडे भ्रमणध्वनीचे IDEA चे प्रिपेड सिमकार्ड गेले दहा वर्ष झाले आहे. गेल्या दहा वर्षात मी स्वतःचा भ्रमण ध्वनीक्रमांक बदलला नाही आणि गेल्या दहा वर्षात कमीत कमी पाच वेळा माझी ओळख असणारी आवश्यक कागदपत्रे दिली आहेत. परंतु गेले दोन महिने माझ्या क्रमांकावर रोज संदेश येत आहे कि आपली कागदपत्रे जमा करा. असे जर असेल तर मी दिलेली आजवर जमा केलेली कागदपत्रे कुठे गेली. याविषयी अनेकदा तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही. याला उपाय काय ?
वापस वरती Go down
Uday More
Modrator


लिखाणांची संख्या : 3
Join date : 13/04/2011

IDEA चे प्रिपेड सिमकार्ड Empty
लिखाणविषय: Re: IDEA चे प्रिपेड सिमकार्ड   IDEA चे प्रिपेड सिमकार्ड Icon_minitime22/4/2011, 6:01 pm

आपण यापूर्वी दिलेली (यापूर्वी कोणकोणत्या तारखेस कागदपत्रे कुणाकडे दिली आहेत किंवा पाठविली आहेत या तपशिलाचा त्यात उल्लेख करावा) आधीची कागदपत्रे कुठे गेली त्याबाबत माहिती द्यावी व अश्या प्रकारचे कागदपत्रांची मागणी करणारे संदेश यापुढे येऊ नयेत, अन्यथा योग्य त्या कायदेशीर मार्गाने पुढे दाद मागण्यात येईल, व त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहील, असा अंतिम इशारा देणारे पत्र रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीला पाठवावे किंवा फॅक्सने पाठवावे.

यात आपणाला सर्वप्रथम १) कस्टमर केअर यांचेशी संपर्क साधावा लागेल (फोनवर संपर्क साधू नये, इमेल केल्यास त्यास त्यांच्याकडून उत्तर देण्यात येते व ते पुढे पुरावा म्हणूनही वापरता येते), त्यांचेकडून समाधान न झाल्यास नोडल ऑफिसर यांचेकडे ती तक्रार पाठविता येईल. नोडल ऑफिसरच्या उत्तरानेही समाधान न झाल्यास याविरुद्ध आपण अॅपिलेट ऑथरीटी यांचेकडे अपील करू शकता या सर्वांचे पत्ते, इमेल अॅड्रेस कंपनीच्या वेबसाईटवर मिळतील.

यातूनही आपणावर झालेला अन्याय दूर झाला नाही, अशी आपली भावना झाली तर शेवटी 'ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत' आपण ग्राहक मंचमध्ये तक्रार करू शकता.
वापस वरती Go down
 
IDEA चे प्रिपेड सिमकार्ड
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: दूरसंचार सेवा :: मोबाईल सेवा-
येथे जा: